Thursday, May 26, 2011

रेशम गाठी

भिजलेल्या डोळ्यातून आज, शब्द मनात उतरले
तिला पाहताच क्षणी, डोळ्यातून अश्रु बरसले.....
तिचीच आस धरून, आयुष्यात मी बिखरलो
नसताना ती जवळ, जगनेही मी विसरलो.....
तिचीच वाट पाहत, पापण्या माझ्या पाणवल्या
सावल्या डोळ्यातून ह्या, आभाळा सारख्या बरसल्या.....
खुप काही म्हणायच होता, शब्द माझे आतुरलेले
मुखातून न उमलता, डोळ्यातून उमललेले.....
म्हंटल ज़रा जवळ जाऊन, तिच्याशी थोड बोलाव
तिच्या आठवणीसंगे जगतो, तिलाही थोड कळाव.....
तिच्या आठवणीची ओंजंळ, तशीच भरून ठेवलेली
एकही क्षण न सांडवता, जिवापाड मी जपलेली.....
कंठ आज दाटून आला, तिला समोर पाहून
बरच काही बोलायच होत, मनात गेले शब्द राहून.....
इतक्यात तिने पाहिले मला, डोळ्यात अश्रु ढाळत
अनेक प्रश्नांची उत्तर मिळाली, मलाही न कळत.....
नव्हती ती आज माझी, झाली दुसर्या कोणाची
रेशम गाठी तुटल्या आमच्या, तरी सदैव राहिली ती या वेड्या मनाची.....

Wednesday, May 25, 2011

जेंव्हा मी...

जेंव्हा मी हरवुन जाईन, तेंव्हा तु मला शोधशील ना?
जेंव्हा मी एकटा पडेन, तेंव्हा तु मला सोबत करशील ना?
चालताना पाय मझे डळमळतील, तेंव्हा आधाराला उभी राहशील ना?
आयुष्याचा रस्ता खुप खडतर असेल, तेंव्हा तु मला साथ करशील ना?

जेंव्हा हे हृदय साद घालील, तेंव्हा तु मला ऐकशील  ना?
जेंव्हा जेंव्हा तुटतील, माझी  स्वप्नं तु विणुन देशील ना?
जेंव्हा कधी माझ्याकडुन चुक होईल, मला माफ तु करशील ना?
जेंव्हा डोळे माझे अश्रुंनी डबडबले असतील, मला तुझ्या उबदार मिठीत घेशील ना?

आयुष्यात खुप दु:खे असतील, थोडी तु वाटुन घेशील ना?
माझ्या नयनी अश्रु वाहतील, नाजुक हातांनी तु पुसशील ना?
काळाच्या ओघात तरुणपण वाहुन जाईल, आता एवधंच प्रेम तेंव्हाही करशील ना?
घे तु ह्र्दयातुन शपथ, शेवटपर्यंत तु जवळ राहशील ना?

म्हणून नाही विचारल मी तिला .......

म्हणून नाही विचारल मी तिला .........
ती आवडली पण मी नाही विचारल तिला ...

Delete करेल " Friend List " मधून ती मला,
म्हणून मी नाही विचारल तिला...............

बोलणार नाही माझ्याशी म्हणून, नाही विचारल मी तिला..
चुकीच्या नज़रेने पहिल ती मला म्हणून, नाही विचारल मी तिला..

एक गैरसमज करून घेइल ती मझ्याबद्दलाचा म्हणून, नाही विचारल मी तिला..
सामोरा कसा जाणार तिच्या म्हणून, नाही विचारल मी तिला..
भेटून सुद्धा नाही भेटणार म्हणून, नाही विचारल मी तिला..

कोणाला सांगू ही शकणार होतो की किती आवडते ती मला ,
कसा सांगणार मी तिला की खुप आवडते ती मला,
भीती वाटते त्या एका " नाही " ची म्हणून, नाही विचारल मी तिला..

अजुन किती " valentines day " निघून जातील, पण नाही विचारणार मी तिला...
राहू दे मला या गोड अश्या गैरसमजुतित की " आवडतो मी तिला "
"आवडतो मी तिला"

मैत्रिण

समोर आलॊ की थोडीशी हड्बडावी,
बोलली नाही तरी आपल्याकडे बघून गोड हसावी.
चालता चालताच पाठून तिनं हाक मारावी,
घर जवळ येताच पुढे निघून जावी.
आपण नसलॊ की थोडीशी हिरमूसावी,
दिसलो की गालवर छान खळी पडावी.
कधी हसता हसताच ती रडावी,
कधी रडता रडताच खुद्कन हसावी.
हक्काने आपल्यावर रागवावी,
मग कही न बोलताच निघून जावी.
नंतर चूक कळल्यावर नुसता मिसकॉल द्यावी,
आपण कॉल केल्यावर मात्र मुद्दाम तो कट्‌ करावी.
सकाळी भेटल्यावर हीचकीचत बोलावी,
निरागस चेहऱ्याने मग माफ़ी मागावी.
लेक्चर ला नसलो तर तिने प्रेसेन्टी लावावी,
वाढदीवसाच्या पार्टीला मात्र नेहमी अबसेन्ट असावी.
ती आनंदात असली की घडघडुन बोलावी,
नाहीतर थोडीशी अबॊल रहावी.
सुखात सगळ्यांना सामिल करावी,
व्यथा फक्त माझ्याकडेच बोलावी.
बाहेरगावी कुठे गेलो तर तिची आठवण यावी,
आठवण काढताच तिला मात्र उचकी लागावी.
परत आल्यावर हसतानाही डोळ्यात पाणी भरावी,
"साधा एक फोनही केला नाही!" म्हणत रुसुन बसावी.
थोडा वेळ मग ती शांत रहावी,
पुढच्याच क्षणाला "माझ्यासाठी काय़ आणले?" म्हणुन विचारावी.
ती बरोबर असली की आधार वाटावी,
अशीही मैत्रिण नशिबानेच लाभावी !!!

दोष तर माझाच

तिच्यासोबत का मी येवढा गुंतलोय
स्वताला विसरून ,तिचाच होऊन बसलो
तिच्या प्रेमासाठी येड्यागत तिच्या अवती भोवती खिदळत बसलो
पण यात दोष ना तिचा,दोष तर माझाच

तिच्यासोबत का मी येवढा गुंतलोय
नाव तिचे वाळूवर लिहिले
पण येणाऱ्या जाणार्या लाटेणी
ते पुसून टाकले
पण यात दोष ना तिचा दोष तर माझाच

कि मी त्या वाळूवर नाव तिचे लिहिले
तिच्यासोबत का मी येवढा गुंतलोय
कि या डोळ्यांना अता तिच्याशिवाय
काहीच बघावास वाटत नाही
तिला पाहिल्याशिवाय एक दिवस हि जात नाही
पण यात दोष ना तिचा, दोष तर माझाच

कि माझ्या डोळ्यांना तिच्या रुपाची गरज भासते
तिच्यासोबत का मी येवढा गुंतलोय
आकाशातल्या त्या अगणित तार्यांपेक्षा हि
माझा तारा मलाच आवडतोय
त्यांच्या प्रकाशापेक्षाही
तिचा प्रकाश माझ्या अंधाराला आवडतोय
पण यात दोष ना तिचा , दोष तर माझाच

कि मी तिला माझ्या मनाचा तारा बनविल
अता एकच मागण देवाकडून
तिचे हास्य तसच राहो,तिचे आसवे माझे होवो
माझ्या विना सुद्धा ती आनंदी राहो
कारण यात दोष ना तिचा,दोष तर माझाच
नकळत तिच्या आयुष्यात येऊन बसलो

असाव कुणीतरी….

असाव कुणीतरी…..तुज़्यामधे मी हरवले म्हननारी…..
असाव कुणीतरी…..
सकाळी साखरझोपेतुन उठवणारी,
आणी तो चेहरा बघुन माजी क्षणात झोप उडावी….
असाव कुणीतरी…..
प्रेमाने सकाळी चहा करून देणारी ,
आणी केविल्वान्य डोळ्यानी माज़कडे पाहत राहणारी…..
असाव कुणीतरी…..
मी जवळ नसताना माज्या सोबत घालवलेल्या,
प्रतेक क्षणाची आठवण काढत राहणारी…..
असाव कुणीतरी…..
माजा वेडेपना पाहून गालातल्या गालात हसणारं,
आणी शब्दांना कानात साठवुन गोड प्रतिसाद देणारी…..
असाव कुणीतरी…..
भरलेच जर डोळे कधी माजे,
तर ओल्या असवांना पुसनारी…..
असाव कुणीतरी…..
माज्या मनात रमनारी,
अंधारलेल्या वाटेत माज्याबरोबर येणारी…..

असाव कुणीतरी…..
पलिकडील किना-यावरून माजी वाट पाहणारी,
उशीर जाला म्हणुन उदास आणी बेचैन होणारी ……
असाव कुणीतरी…..
असाव कुणीतरी…..तुज़्यामधे मी हरवले म्हननारी…

Friday, May 6, 2011

आंतरजातीय विवाह आणि समाज

तुम्हाला वाटेल मी हा काय विषय घेतला आहे आज लिहायला पण एकविसाव्या शतकात आपण जगत असलो तरी आज विचार करायची वेळ आली आहे कि आपला समाज खरच आंतरजातीय विवाहासाठी मानसिकरीत्या तयार आहे का? पुणे- मुंबई सारख्या मोठ्या शहरात जरी या गोष्टी आजकाल खूप सहजरीत्या घडत असल्या तरी अजूनही माझ्या मते आपला समाज आंतरजातीय विवाहासाठी मानसिकरीत्या तयार नाही. आजकाल जरी आपले पालक प्रेम विवाहाला संमती सहजरित्या देत असले तरी त्यांचा पहिला प्रश्न हाच असतो की त्याची किंवा तिची जात कोणती?   भारतीय संस्कृतीवर जातीचा एवढा जबरदस्त पगडा आहे की तो इतक्या सहजपणे हटने शक्य नाहीये. आणि जरी पालक तयार झाले तरी समाजातील काही लोक असे असतात की समाजात वावरणे अवघड करून सोडतात. मोठ्या शहरांमधील धकाधकीच्या  जिवनात  याचा फारसा प्रभाव जाणवत नसला तरी थोड्याफार प्रमाणात अशा जोडप्यांना होणारा त्रास हा सर्वच ठिकाणी सारखा आहे.
 मुलीचा सासुरवाडीकडील लोकांकडून छळ झाल्याच्या बातम्या आजही वर्तमानपत्रात वाचायला मिळतात. हे काही फक्त आंतरजातीय विवाहामध्ये होते असे मला म्हणायचे नाही पण तरी प्रश्न उद्भवतोच की आपल्या जातीवादी समाजव्यवस्थेत लग्नानंतर किती जोडपी टिकून राहतात. तसे पहिले तर यशस्वी आंतरजातीय विवाहाची उदाहरणे काही कमी नाहीत . आज कालच्या तरुण मुलांमध्ये पाश्चिमात्य संस्कृतीचा प्रभाव पाहता ही पिढी चंगळवादाकडे जात आहे असे बरेचदा म्हाताऱ्या माणसांकडून ऐकायला मिळते आणि ते कुठेतरी थोड्या फार प्रमाणात खरे पण आहे. आजकालची मुले-मुली फक्त एक क्रेझ (sorry for the word ) म्हणून बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड बाळगतात. ही वृत्ती बदलायला हवी. 
शेवटी संसार हा फक्त त्या दोघांना करायचा असतो आणि जेथे मने जुळली तेथे जातपात ही  दुय्यम ठरत असली तरी पण लग्न करून समजतच राहावे लागते हे विसरून चालणार नाही आणि समाज हा अशा प्रकारच्या लोकांनी भरला आहे. त्यामुळे नाण्याचा दोन्ही बाजूंचा विचार करूनच निर्णय घ्यावा असे मला वाटते. अजून एक फार मोठा मुद्दा इथे उभा राहतो की एखादा मुलगा जर आंतरजातीय विवाह करत असेल आणि दुसरीकडे स्वतःच्या बहिणीला आंतरजातीय विवाहाला विरोध करत असेल तर त्याला आपण काय म्हणणार?
त्यामुळेच माझ्या मनात आज विचार आला की
 खरच आपला समाज आंतरजातीय विवाहाला मानसिकरीत्या तयार आहे का?